Viral News: पाकिस्तानच्या तरुणाचं 70 वर्षीय कॅनडियन महिलेशी लग्न; नेटकरी म्हणाले, प्रेम वगैरे काही नाही हे तर...| 35 Year Old Pakistani Man Marries 70 Year Old Canadian viral story knp94 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News: पाकिस्तानच्या तरुणाचं 70 वर्षीय कॅनडियन महिलेशी लग्न; नेटकरी म्हणाले, प्रेम वगैरे काही नाही हे तर...

नवी दिल्ली- एका पाकिस्तानी व्यक्तीने एका कॅनडाच्या महिलेशी लग्न केल्याची बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. कारणही तसंच आहे कारण दोघांच्या वयामध्ये ३५ वर्षांचा फरक आहे. नईम शहजाद असं व्यक्तीचे नाव असून तो ३५ वर्षाचा आहे. तर त्याची पत्नी ७० वर्षाची आहे. या दोघांच्या लग्नाची बातमी मोठ्या प्रमाणात चघळली जात आहे. दोघांनी कोणत्या कारणासाठी लग्न केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानच्या गुजरातमध्ये राहणाऱ्या नईमने सांगितले की २०१७ मध्ये त्याची महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. महिलेने फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र बनले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमही झालं. नईमने महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर महिलेने लग्नासाठी होकार दिला.

दोघांच्या वयामध्ये खूप फरक असल्याने अनेकांनी याबाबत शंका व्यक्त केल्या. असे असले तरी नईमने महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नईमने सांगितल्यानुसार त्याला कॅनडाला जायचं आहे. त्यासाठी त्याने व्हिसासाठी अर्ज केला होता. पण, तो फेटाळल्यात आलाय. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा व्हिसासाठी अर्ज केला आहे. नईमने पैशासाठी महिलेशी लग्न केलंय असा काहीजण आरोप करताहेत.

नईमने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, त्याने केवळ कॅनडाला जाण्यासाठी हे लग्न केलेले नाही. आयुष्यात जीवनसाथीसोबत मिळून एक स्थिर जीवन सुरु करण्यासाठी त्याने लग्न केले आहे. पत्नी आर्थिक रुपात त्याला मदत करत असते. नईमने काम करावं असं त्याच्या पत्नीला वाटत नाही. महिला जास्त श्रीमंत नसून पेन्शनवर जगते.

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. नईमने पैसा पाहूनच ७० वर्षाच्या महिलेशी लग्न केलं असं काहीजण म्हणत आहेत. नईमने एक मुलाखत दिली होती, त्यात त्याने म्हटलं होतं की, त्याची आणि महिलेची ओळख ७ वर्षांपूर्वी फेसबुकवरुन झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पैसे कमावण्यासाठी एक यूट्यूब चॅनेल सुरु करणार असल्याचं तो म्हणाला. (Latest Marathi News)

टॅग्स :PakistanCanada