36 ब्रिटिश खासदारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; मोदी सरकारवर दबाव आणण्याची मागणी

britain farmer.
britain farmer.

लंडन- देशात शेतकरी आंदोलन तीव्र होत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकरी आंदोलनाची धग विदेशातही पोहोचत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता ब्रिटिश संसदेतील विविध पक्षाच्या 36 खासदारांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या खासदारांचाही समावेश आहे. 

ब्रिटिश संसदेच्या 36 खासदारांनी ब्रिटिश विदेश सचिव डोमेनिक राब यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी सरकारकडे शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उचलून धरावा अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. मजूर पक्षाचे खासदार तनमनजीत सिंग यांनी राब यांच्याकडे यासंदर्भात बैठक घेण्याची मागणी केली आहे.  

ऑनलाईन्स गेमिंगच्या जाहिराती आधी वैधानिक इशारा हवाच; केंद्राकडून नव्या...

राब यांना लिहिलेल्या पत्रावर मजूर, पुराणमतवादी आणि स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यात मजूर पक्षाचे माजी नेते जेरमी कोर्बायन Jeremy Corbyn, विरेंद्र शर्मा, सीमा मल्होत्रा, वेलेरी वाझ Valerie Vaz, नाडीया विट्टोम Nadia Whittome, पिटर बोटोमले Peter Bottomley, जॉन मॅकडोनल John McDonnell, मार्टिन डोचेर्टी Martin Docherty-Hughes आणि अॅलिसन थेवलीस Alison Thewliss या खासदारांचा समावेश आहे. 

पत्रामध्ये म्हणण्यात आलंय की, हा मुद्दा यूकेमधील शीखांशी आणि पंजाबशी जोडले गेलेल्या नागरिकांसंबंधी आहे. तसेच याचा परिणाम भारतातील अन्य राज्यांवरही पडणार आहे. अनेक ब्रिटिश शीख नागरिकांनी स्थानिक खासदारांकडे हा मुद्दा उचलून धरला आहे. नव्या कृषी कायद्यामुळे पंजाबमधील त्यांच्या परिवारातील सदस्य आणि पूर्वजांच्या जमिनीवर याचा प्रभाव पडणार आहे. 

चर्चेची आजची पाचवी बैठक होणार 'आर या पार'; शेतकऱ्यांनी व्यक्त केला...

अनेक खासदारांनी भारतीय उच्चायुक्ताला यासंबंधी लिहिले असून तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं म्हटलं आहे. नवे कायदे शेतकऱ्यांना शोषणापासून सुरक्षा पुरवण्यास आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यास कमी पडत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटिश खासदारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेतकरी आंदोलनासंबंधी पोस्ट टाकून हा मुद्दा तापवला आहे. 

मजूर पक्षाच्या खासदार प्रिती कौर गील यांनी भारतात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याच देशातील नागरिकांना जे शांततेने आंदोलन करत आहेत, त्यांना अशी वागणूक दिली जाते का? शेतकरी आंदोलनाचे फोटो पाहून मला धक्का बसला आहे. शेतकऱ्यांविरोधात पाण्याचे फवारे, अश्रू धुळकांड्या वापरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न होत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com