इराणमध्ये न्यूक्लियर प्लांटजवळ शक्तिशाली भूकंप

वृत्तसंस्था
Wednesday, 8 January 2020

इराणच्या बुशहर शहरात आज सकाळी मोठे भूकंपाचे धक्के जाणवले.

बुशहर : इराणच्या बुशहर शहरात बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.५० वाजता मोठे भूकंपाचे धक्के जाणवले.

 

President Hassan Rouhani visiting the Bushehr nuclear power plant in 2015.

रिश्टर स्केलवर याची ४.९ इतकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे इराणच्या अणुऊर्जा केंद्राजवळच हा भूकंप झाला आहे. दरम्यान, कुठल्याही नुकसानीची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने याबाबत माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराणच्या बोराझजान शहरापासून आग्नेय दिशेला १० किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. एवढ्याच तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के डिसेंबर महिन्यातही इथे बसले होते. आजचे जाणवलेले धक्के हे नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचेच धक्के असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

A 5.1magnitude earthquake has struck Iran, 53km from the country’s nuclear facility at Bushehr, according to the US Geological Survey.

बुधवारी सकाळी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर काही क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी ट्विटद्वारे यावर ‘ऑल इज वेल’ म्हणजेच सर्वकाही ठीक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

सकाळच्या दरम्यान ही कारवाई सुरु असल्याने यातूनच आवाज किंवा हादरे जाणवत असावेत असा समज होता. मात्र, हे हादरे हवाई हल्ल्यांमुळे नव्हे तर नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचे धक्के असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 4.9 magnitude earthquake struck near irans bushehr inform united states geological survey