पाकिस्तानातील पाचशे वर्षे जुना गुरुद्वारा भारतीयांसाठी खुले

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथील पाचशे वर्षे जुना गुरुद्वारा भारतीय शीख भाविकांसाठी खुला करण्यात आली आहे. बाबे दे बेर असे गुरुद्वाराचे नाव असून, यापूर्वी भारतीय भाविकांना तेथे जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. सियालकोट शहरापासून हा गुरुद्वारा सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. 

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथील पाचशे वर्षे जुना गुरुद्वारा भारतीय शीख भाविकांसाठी खुला करण्यात आली आहे. बाबे दे बेर असे गुरुद्वाराचे नाव असून, यापूर्वी भारतीय भाविकांना तेथे जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. सियालकोट शहरापासून हा गुरुद्वारा सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. 

पाकिस्तानने भारताबरोबरच युरोप, कॅनडा आणि अमेरिकेतील भाविकांनादेखील गुरुद्वारा खुला केला आहे. पंजाब प्रांताचे गव्हर्नर मोहंमद सरवर यांनी प्रांताच्या औकाफ खात्याला गुरुद्वारासंदर्भातील आदेश दिले आहेत. भारतासह अनेक देशांतील शीख भाविक पंजाब प्रांतातील अनेक धार्मिक स्थळी नेहमीच जातात.

शीख परंपरेनुसार 16व्या शतकात गुरू नानक हे काश्‍मीरहून सियालकोट येथे आले. ते बेरीच्या झाडाखाली थांबले होते. या भेटीच्या स्मरणार्थ सरदार नत्था सिंग यांनी गुरुद्वारा उभारला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500-year-old gurdwara in Pakistan's Punjab province opens doors for Indian Sikh pilgrims