Turkey Earthquake : भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखानं व्यक्त केली भीती

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानं जगभरातील लोकांना हादरवून सोडलंय.
Turkey-Syria Earthquake
Turkey-Syria Earthquakeesakal
Summary

भूकंपामुळं तुर्की आणि सीरियात शोककळेचं वातावरण आहे. भूकंपग्रस्त भागात बचावाचं कार्य सुरु असताना अनेक विलक्षण गोष्टी समोर येत आहेत.

Turkey-Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानं जगभरातील लोकांना हादरवून सोडलंय. या भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

इथं मदतकार्य अतिशय वेगानं सुरू आहे. मृतांचा आकडा वाढतच आहे. भूकंपामुळं तुर्की आणि सीरियात शोककळेचं वातावरण आहे. भूकंपग्रस्त भागात बचावाचं कार्य सुरु असताना अनेक विलक्षण गोष्टी समोर येत आहेत. काहींवर विश्वास ठेवणंही अवघड जात आहे.

Turkey-Syria Earthquake
PM Modi : पूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकवण्याची परवानगी होती, पण आता..; मोदींचा काँग्रेसवर पुन्हा निशाणा

अशातच आता संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स (Martin Griffiths) यांनी भीती व्यक्त केलीये. या विनाशकारी भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असेल. प्रत्यक्षात आम्ही मृतांचा आकडा मोजायला सुरुवात केलेली नाही, पण ज्या प्रकारे ढिगारा दिसतोय, त्यावरून हा आकडा 50 हजारांच्या पुढं जाऊ शकतो, हे स्पष्ट होतं. सध्या आम्ही बचाव कार्य जोमात सुरु केलं असून लोकांची काळजी घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

Turkey-Syria Earthquake
Amit Shah : देशद्रोह्यांना बळ देणारा काँग्रेस पक्ष कधीच राज्याचं रक्षण करू शकत नाही; अमित शहांचा हल्लाबोल

भूकंपातील अधिकृत मृतांची संख्या तुर्कीमध्ये 24,617 आणि सीरियामध्ये 3,574 आहे. कारण, हजारो बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. युनायटेड नेशन्सनं यापूर्वी इशारा दिला होता की, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 8,70,000 लोकांना अन्नाची तातडीची गरज भासेल आणि एकट्या सीरियामध्ये 5.3 दशलक्ष लोक बेघर होऊ शकता, असं नमूद केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com