सीरियात दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात 53 नागरिकांचा मृत्यू, ISIS ला धरलं जबाबदार I Terror Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist Attacks in Syria Homes

जेव्हा नागरिकांवर हल्ला झाला तेव्हा पीडित वाळवंटातील ट्रफल्स गोळा करत होते.

Terror Attack : सीरियात दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात 53 नागरिकांचा मृत्यू, ISIS ला धरलं जबाबदार

दमास्कस : गेल्या शुक्रवारी सीरियातील होम्समध्ये (Syria Homes) प्राणघातक हल्ला (Terrorist Attack) झाला होता. यात जवळ-जवळ 53 लोकांचा मृत्यू झाला होता.

राज्य माध्यमांनी या हल्ल्याला जिहादी दहशतवादी गट इस्लामिक स्टेटला जबाबदार धरलंय. मात्र, या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.

होम्सच्या पूर्वेकडील अल-सोखना शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 53 लोक मारले गेल्याचं वृत्त सरकारी वृत्त वाहिनीनं दिलंय. पालमायरा रुग्णालयाचे संचालक वालिद ऑडी (Walid Audi) यांनी सांगितलं की, 'मृतांमध्ये 46 नागरिक आणि सात सैनिकांचा समावेश आहे. यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सनं शुक्रवारी या हल्ल्याची माहिती दिली.'

इसिसनं नागरिकांच्या गाड्या जाळल्या

राज्य माध्यमांनी सांगितलं की, जेव्हा नागरिकांवर हल्ला झाला तेव्हा पीडित वाळवंटातील ट्रफल्स गोळा करत होते. पाच जखमींना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाचलेल्यांपैकी एकानं सांगितलं की, ISIS नं आमच्या गाड्या जाळल्या आहेत. मात्र, संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी तातडीनं स्वीकारलेली नाहीये.