नेपाळला भूकंपाचा धक्का; जिवीतहानी नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

या भूकंपामुळे जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून, वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणविण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

काठमांडू - नेपाळला आज (सोमवार) पहाटे भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास नेपाळची राजधानी काठमांडूसह आसपासच्या भागाला 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. एव्हरेस्ट पर्वताजवळ सोलखुंबू जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. काठमांडूपासून हे ठिकाण 150 किमी अंतरावर आहे. या धक्क्यानंतर दुसरा धक्काही 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा बसला.

या भूकंपामुळे जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून, वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणविण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

Web Title: 5.5 magnitude quake hits Nepal, no casualties reported

टॅग्स