जपानला 5.6 रिश्‍टर स्केल भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

भूकंपाचे केंद्रस्थान फुकुशिमाच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर होते. पूर्व जपानलाही या भूकंपाचा धक्‍का सौम्य प्रमाणात जाणवला

टोकियो - जपानला आज (गुरुवार) 5.6 रिश्‍टर स्केल भूकंपाचा धक्‍का बसला. या भूकंपामुळे येथील आण्विक प्रकल्पांना कोणताही धोका उद्‌भविलेला नसून त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही.

भूकंपाचे केंद्रस्थान फुकुशिमाच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर होते. पूर्व जपानलाही या भूकंपाचा धक्‍का सौम्य प्रमाणात जाणवला. जपान हा जगात भूकंप सर्वांत जास्त होण्याचे प्रमाण असलेल्या "रिंग ऑफ फायर' क्षेत्रामध्ये येतो.

Web Title: 5.6 magnitude earthquake strikes Japan