56 वर्षीय ब्रिटन पंतप्रधानांनी केलं गुपचुप लग्न

56 वर्षीय ब्रिटन पंतप्रधानांनी केलं गुपचुप लग्न

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना काळात आपलं लग्न उरकलं आहे. 56 वर्षीय बोरिस यांनी कॅरी सायमंड्ससोबत लगीनगाठ बांधली. बोरिस जॉनसन यांनी 33 वर्षीय कॅर यांच्यासोबत वेस्टमिंस्टर कॅथेड्र येथे गुपचुप लग्न उरकलं. कॅरी सायमंड्स बोरिस यांच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बोरिस आणि कॅरी यांचा विवाहसोहळा पार पडला.

द सन या वर्तमानपत्रानं बोरिस आणि कॅरी जुलै 2022 मध्ये लग्न करणार असल्याचं वृत्त दिलं होतं. दोघांनी कुटुंबिय आणि मित्र परिवारांना निमंत्रणही पाठवलं होतं. पण अचानक बोरिस आणि कॅरी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बोरिस आपलं आयुष्य खूपच खासगी स्वरुपात जगतात. जॉनसन यांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालयातील प्रवक्त्यानं या लग्नाच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.

56 वर्षीय ब्रिटन पंतप्रधानांनी केलं गुपचुप लग्न
WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, लग्नाआधी शेवटच्या क्षणी जवळील लोकांना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी जॉनसन यांच्या कार्यालयातील एका मोठ्या व्यक्तीचं लग्न असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभात फक्त 30 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी दीड वाजता कॅथोलिक कॅथेड्रलला बंद करण्यात आलं होतं. त्यांनतर बोरिस यांनी कॅरी सायमंड्ससोबत पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं.

जॉनसन (56) आणि सायमंड्स डाउनिंग स्ट्रीटमध्ये 2019 मध्ये एकमेंकाना भेटले होते. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमांचा अंकुर फुलला होता. गतवर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com