ब्राझीलमध्ये कैद्यांच्या हाणामारीत 57 जणांचा मृत्यू; 16 जणांचे शीर तोडले

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

ब्राझिलच्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे सरकारलाही त्यांच्यावर नियंत्रण करता आले नाही. तसेच एका गटाने दुसऱ्या गटाच्या सेलला आग लावली. या आगीत अनेक कैद्यांचा मृत्यू झाला, असे जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रासिलया (ब्राझिल) : ब्राझिलमधील पारा राज्यातील अल्टामीरा तुरुंगात सोमवारी एक धक्कादायक प्रकार असून, तुरुंगातील कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तब्बल 57 कैद्यांचा मृत्यू झाला असून, यातील 16 जणांचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले आहे.

ब्राझिलच्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे सरकारलाही त्यांच्यावर नियंत्रण करता आले नाही. तसेच एका गटाने दुसऱ्या गटाच्या सेलला आग लावली. या आगीत अनेक कैद्यांचा मृत्यू झाला, असे जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुरुंगात सकाळी सात वाजता एक गट नाश्ता करण्यासाठी बसला होता. त्यावेळी दुसऱ्या गटाच्या आरोपींनी येऊन थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तुरुंगाचे कर्मचारीही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

हल्ला का आणि कशामुळे झाला याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. पण व्हिडीओमध्ये दिसत आहेत की, सर्व आरोपी हाणामारी झाल्यानंतर मजा मस्ती करताना दिसत आहे. तसेच ते फरशीवर पडलेल्या शीरांना लात मारत आहेत. अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 Killed Several Beheaded In Clash Between Rival Gangs In Brazil Prison