इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप; 6.1 तीव्रतेची नोंद

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

- इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप

त्सुनामीची शक्यता नाही

जकार्ता : इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला. हा भूकंप पश्चिमी मध्य प्रांतातील जावा येथे झाला. आज (मंगळवार) सकाळी सहाच्या सुमारास हा भूकंप झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत हवामान विभागाने माहिती दिली असून, इंडोनेशियाच्या भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

इंडोनेशियाच्या स्थानिक वेळेनुसार, 5 वाजून 54 मिनिटांनी झाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू जावा प्रांतातील जेपारा जिल्ह्यापासून 578 किमीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. यापूर्वीही 4.0 रिश्टर स्केलचाही भूकंप झाला होता. त्यानंतर आता इंडोनेशियामध्येही मोठा भूकंप झाला असून, याचे झटकेही काहींना मिळाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्सुनामीची शक्यता नाही

भूकंपाच्या केंद्राजवळच्या क्षेत्रात जेपारा जिल्ह्यात भूकंपाते धक्के जाणवले. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणतेही ठिकाण बाधित झालेले नाही. याशिवाय या घटनेनंतर परिसरात कोणतीही भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली नाही, अशी माहिती आपात्कालीन विभागाचे सचिव एप्रिलिया एलिसियावती यांनी दिली. 

6.6-magnitude quake strikes

सोमवारी रात्रीही भूकंप

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर आता इंडोनेशियामध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाने दिली आहे. 

2018 मध्येही मोठा भूकंप

दरम्यान, 2018 मध्ये 7.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर सुलावेसी द्वीपवर आलेल्या त्सुनामीमध्ये जवळपास 4300 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. 

महत्त्वाची बातमी! व्हिसाबाबत अमेरिकेने घेतलाय मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 point 6 magnitude earthquake strikes in Indonesia