जपानमध्ये पुन्हा भूकंप; त्सुनामीचा इशारा नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

टोकियो : जपानमधील फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाजवळ आज (गुरुवार) पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्‍टर स्केल इतकी होती. सोमवारीच या भागात 7.4 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.

गुरुवारच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा प्रशासनाने दिलेला नाही. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता हा भूकंप झाला. त्यानंतरच्या दीड तासात 3.2 ते 4.6 अशा तीव्रतेचे एकूण पाच धक्केही बसले. आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमापासून 210 किलोमीटर अंतरावर होता.

सोमवारी आलेल्या मोठ्या भूकंपामुळे एक मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांमुळे फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाला कोणताही धक्का बसलेला नाही. याच भागात 2011 मध्ये झालेल्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे 18 हजार जणांचा मृत्यु झाला होता. तसेच, फुकुशिमाच्या अणुउर्जा प्रकल्पातील 'कुलिंग सिस्टिम'ही बंद पडल्यामुळे किरणोत्सर्गही झाला होता. 2011 मधील विध्वंसक भूकंपानंतर फुकुशिमामधील संरक्षक यंत्रणा अद्ययावत करण्ण्यात आली होती. त्यामुळे उंच लाटा उसळल्या असल्या, तरीही अणुउर्जा प्रकल्पाचे नुकसान झालेले नाही.

Web Title: 6.1 Earthquake Shakes Japan, No Tsunami Risk