बारवर गोळीबार; हल्ल्यात 7 पुरुषांसह 3 महिला ठार, 5 जण जखमी I Mexico Shooting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting in Mexico

Mexico Shooting : बारवर गोळीबार; हल्ल्यात 7 पुरुषांसह 3 महिला ठार, 5 जण जखमी

मेक्सिको : मेक्सिकोतील गुआनाजुआटो (Mexico Guanajuato) इथं सशस्त्र लोकांनी एका बारवर हल्ला केल्यामुळं दहा जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. या हल्ल्यात पाच जण जखमीही झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मृतांमध्ये सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शनिवारी स्थानिक वेळेनुसार, रात्री 11 वाजल्यानंतर एल एस्टाडिओ बारमध्ये हा हल्ला झाला.

दोन सशस्त्र लोकांच्या एका गटानं शहरांना जोडणाऱ्या महामार्गावरील एल एस्टाडिओ बारवर (El Estadio Bar) हल्ला केला. जेव्हा सशस्त्र लोकांचा एक गट बारमध्ये घुसला आणि त्यांनी सेलाया-क्वेरेटारो शहरांना जोडणार्‍या महामार्गावरील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला.

याआधीही बारमध्ये गोळीबाराच्या घटना

गुआनाजुआटो हा एक समृद्ध औद्योगिक प्रदेश आहे. हे मेक्सिकोच्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांचं घर आहे. हे आता देशातील सर्वात रक्तरंजित राज्य बनलंय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुआनाजुआटो येथून अशीच एक घटना उघडकीस आली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार तर दोन जण जखमी झाले होते.

टॅग्स :Crime Newsglobal news