राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेत भारताची 70 वर्षे पूर्ण

यूएनआय
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नागरिकांच्या रक्षणापासून देशांमधील संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मदत करण्यासाठी भारतीय पुरुष आणि महिला संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या माध्यमातून गेली 70 वर्षे सेवा बजावत असून, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा यशस्वी करण्याची कामगिरी नोंदविली आहे. 

न्यूयॉर्क : नागरिकांच्या रक्षणापासून देशांमधील संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मदत करण्यासाठी भारतीय पुरुष आणि महिला संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या माध्यमातून गेली 70 वर्षे सेवा बजावत असून, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा यशस्वी करण्याची कामगिरी नोंदविली आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य अनेक अडचणींनंतरही सुरू आहे आणि आम्ही भारतासारख्या अविभाज्य भागीदारांसाठी आभारी आहोत, जे नव्या आव्हानातून उभे राहिले आहेत आणि सातत्याने कमकुवत नागरिकांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांत अर्थपूर्ण भाग घेत आहेत, असे गौरवोद्‌गार शांतिसेनेचे महासचिव जिन पीएरे लॅक्रोईक्‍स यांनी एका मुलाखतीत काढले. 

लॅक्रोईक्‍स यांनी जूनमध्ये भारत दौरा करताना भारतीय लोक आणि सरकारचे आभार मानले होते. त्याचप्रमाणे त्यांनी बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानचेही त्यांच्या शांतिसेनेतील योगदानाबद्दल आभार मानले होते. या चार देशांमधील सुमारे 91 हजार जवान शांतिसेनेच्या जगभरातील 14 मोहिमांमध्ये आपले योगदान देत आहेत. भारताने सर्वप्रथम 1950मध्ये कोरियातील मोहिमेद्वारे शांतिसेनेतील आपल्या प्रवासाला सुरवात केली होती आणि गेली 70 वर्षे भारतीय जवान यामध्ये मोठे योगदान देत आहेत. आतापर्यंतच्या मोहिमांमध्ये भारताचे सुमारे 163 जवान हुतात्मा झाले आहेत. 

Web Title: 70 years of Indias victory in UN peacekeeping