लोक जमीन खोदत होते, एकापाठोपाठ एक 73 प्रेतं सापडली; घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोक जमीन खोदत होते, एकापाठोपाठ एक 73 प्रेतं सापडली; घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे

लोक जमीन खोदत होते, एकापाठोपाठ एक 73 प्रेतं सापडली; घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे

नैरोबीः अंधश्रद्धेपोटी एक-दोन नव्हे तर ७३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोक जमीन खोदत होते आणि मृतदेह सापडत होते. या घटनेने देशात खळबळ माजली आहे.

केनियामध्ये ही घटना घडली आहे. एका पादरीच्या मालकीच्या जागेत पोलिसांना ७३ मृतदेह सापडले आहेत. या मृत्यूचं कारणदेखील संताप आणणारं आहे.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सदरील पादरीने आपल्या अनुयायांना उपोषण करण्यास सांगितलं होतं. उपोषण केल्याने येशूची भेट घडेल, असं सांगून त्याने लोकांना उपोषण करायला लावलं. त्यातच ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना मालिंदी येथील किल्फी प्रांतामध्ये घडली असून पोलिसांना पादरीला ताब्यात घेतलं आहे. पादरीच्या मालकीच्या जमिनीमध्ये अजूनही खोदकाम सुरुच आहे.

सदरील पादरीचं नाव पॉल मॅकेंझी असं आहे. खोदकामामध्ये पोलिसांना आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. पॉल मॅकेंझी या पादरीला १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्यानंतर आता खोदकाम सुरु करण्यात आलं.

'तुम्ही उपोषण केलं तर तुमची येशू ख्रिस्ताशी भेट होईल' असं पादरीने आपल्या अनुयायांना सांगितलं होतं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने ७३ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime News