नायजेरियातील हिंसाचारात 86 जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

नायजेरियातील शेतकरी समुदायावर भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात 86 जण मृत्युमुखी पडले आहेत. मध्य नायजेरियात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, त्या पार्श्वभूमीवर नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.

जोस (नायजेरिया) - नायजेरियातील शेतकरी समुदायावर भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात 86 जण मृत्युमुखी पडले आहेत. मध्य नायजेरियात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, त्या पार्श्वभूमीवर नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे. 

बेरॉम या शेतकरी समुदायातील नागरिकांनी गुरुवारी फुलानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटक्‍या जमातीमधील नागरिकांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी शेतकरी समुदायावर हल्ला केला होता. त्यात 86 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, सुमारे 50 घरे जाळण्यात आली आहेत. नायजेरियातील सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असून, हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे अध्यक्ष बुहारी यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दशकांपासून नायजेरियात सुरू असलेल्या हिंसाचारात हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 86 people killed after weekend violence in Nigeria