नौका दुर्घटनेत 90 प्रवासी बुडाल्याची भीती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

त्रिपोली - लिबियाच्या पश्‍चिम किनाऱ्यावर प्रवाशांना घेऊन जाणारी नौका बुडाल्याने 90 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर काल नौका उलटली आणि शंभराहून अधिक बुडाले. मात्र तटरक्षक दलाच्या जवानांनी 29 प्रवाशांना वाचवले. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितले, की या नौकेवर सुमारे 126 प्रवासी होते आणि एका बाजूला नौकेचा जोड निघाल्याने ती बुडू लागली.

त्रिपोली - लिबियाच्या पश्‍चिम किनाऱ्यावर प्रवाशांना घेऊन जाणारी नौका बुडाल्याने 90 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर काल नौका उलटली आणि शंभराहून अधिक बुडाले. मात्र तटरक्षक दलाच्या जवानांनी 29 प्रवाशांना वाचवले. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितले, की या नौकेवर सुमारे 126 प्रवासी होते आणि एका बाजूला नौकेचा जोड निघाल्याने ती बुडू लागली. संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासित केंद्राच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पश्‍चिम आशिया आणि आफ्रिकेतून बेकायदेशीररीत्या युरोपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात या वर्षी साडेतीन हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या आकडेवारीइतकीच आहे.

Web Title: 90 dead in ferry accident

टॅग्स