पाकमधील लाखो नागरिकांचे कुत्र्यांनी तोडले लचके...

बुधवार, 21 ऑगस्ट 2019

भारत-पाकिस्तानमधील तवाणावाचे संबंध असल्यामुळे भारताकडून औषधे मिळत नसल्यामुळे नागरिकांना उपचार करण्यास अडचणी येत आहेत.

कराचीः पाकिस्तानमधील सिंध प्रांतात 30 जून पर्यंत तब्बल 92 हजार नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत, अशी माहिती सिंध प्रांताचे आरोग्यमंत्री अझरा पेछुहो यांनी दिली.

'भारत-पाकिस्तानमधील तवाणावाचे संबंध असल्यामुळे भारताकडून औषधे मिळत नसल्यामुळे नागरिकांना उपचार करण्यास अडचणी येत आहेत. कुत्र्याने चावा घेतलेल्यांपैकी अनेकांवर अद्यापही उपचार झालेले नाहीत. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांवर तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे,' असे अझरा पेछुहो यांनी सांगितले.

अझरा पेछुहो म्हणाल्या, 'सिंध प्रांतामध्ये 30 जून अखेर 92 हजार 159 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. रुग्णालयामध्ये 6 हजार 29 जणांवरच उपचार होऊ शकले आहेत. औषधांचा पुरवठा नसल्यामुळे अन्य नागरिकांवर उपचार होऊ शकत नाहीत. केंद्र सरकारने या प्रश्नाकडे तत्काळ लक्ष द्यायला हवे.'