Video : काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण झालं व्हायरल

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नऊ कोटी 60 लाख काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओलाही मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्स याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यूयॉर्क : नऊ कोटी 60 लाख काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओलाही मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्स याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेतमधील लॉस एंजल्सजवळच्या धरणात नऊ कोटी 60 लाख काळे चेंडू सोडण्यात आले आहे. संपूर्ण धरण काळ्या चेंडूंनी झाकले गेले आहे. धरणाच्या पाण्यावर काळ्या चेंडूंची चादर पाहायला मिळते. परंतु, धरणामध्ये काळे चेंडू कशासाठी टाकले आहेत, असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.

...म्हणून सोडले काळे चेंडू
धरणातील पाण्याचे बाष्पीभवन रोखणे हे एक कारण आहे. पण, मुख्य कारण वेगळेच आहे. धरणातील पाणी एकाच ठिकाणी साठलेले असते. या साठलेल्या पाण्यावर सूर्याची किरण पडल्यामुळे पाण्यातील घटकांमध्ये ब्रोमाईड तयार होते. हे ब्रोमाईड माणसासाठी घातक असते. शिवाय, शितपेयं बनवणाऱ्या कंपन्यांच्या मिश्रणावरही ब्रोमाईड विपरीत परिणाम करते. यावर एकच उपाय म्हणजे धरण बंदिस्त करणे. धरण झाकण्यापेक्षा  काळ्या रंगाचे चेंडू या धरणात सोडण्यात आले आहेत. चेंडू बाष्पीभवन रोखत असून, सूर्यकिरणांचा आणि पाण्याचा संबंध येत नसल्यामुळे पाण्यात ब्रोमाईड तयार होत नाही. यामुळे लॉस एजंल्समधील नागरिकांना चांगले पाणी मिळत आहे.