PUBG च्या व्यसनात अल्पवयीन मुलाने केली कुटुंबाची हत्या

घटनेच्या दिवशी या मुलाच्या आईने मुलाला गेम खेळण्यावरून खडसावले होते.
pubg
pubg

लाहोर : ऑनलाइन गेम PUBG ने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी देखील या गेमच्या व्यसनात (Online Game) लोकांना घरातून पैसे चोरण्यापर्यंतच्या घटना आपण पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. मात्र, पाकिस्तानमध्ये (Pakistan) एका अल्पवयीन मुलाने या गेमच्या नादात आई आणि तीन भावडांची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर येथील येथे ही घटना घडली आहे. (Boy Killed Entire Family Under PUBG Influence)

pubg
वडिलांनी साठवलेले 16 लाख रुपये मुलाने PUB-G वर उडवले, खातं रिकामं झाल्यावरच घरी समजलं

दरम्यान, PUBG च्या प्रभावाखाली आई आणि भावंडांची हत्या केल्याची कबुली यामुलाने पोलिसांना दिली आहे. घटनेच्या दिवशी या मुलाच्या आईने मुलाला गेम खेळण्यावरून खडसावले होते. त्यानंतर, मुलाने कपाटातून पिस्तूल काढत रागाच्या भरात आईसह त्याच्या इतर तीन भावंडांवर गोळ्या झाडल्या. लाहोरमधील ऑनलाइन गेमशी संबंधित हा चौथा गुन्हा आहे. 2020 मध्ये जेव्हा पहिले प्रकरण समोर आले तेव्हा तत्कालीन पोलीस अधिकारी झुल्फिकार हमीद यांनी लाखो किशोरवयीन मुलांचे जीवन, वेळ आणि भविष्य वाचवण्यासाठी गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती.

pubg
PUB G खेळणाऱ्या दोघांना रेल्वेने चिरडले; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अधिकृतपणे गेमिंग डिसऑर्डरला रोगाच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणामध्ये एक रोग म्हणून समाविष्ट केले आहे. गेमिंग डिसऑर्डरची व्याख्या गेमिंग (डिजिटल किंवा व्हिडिओ) वरील अशक्त नियंत्रण, गेमिंगला इतर हितसंबंध आणि दैनंदिन क्रियाकलापांपेक्षा प्राधान्य देण्याच्या मर्यादेपर्यंत दिले जाणारे प्राधान्य वाढवणे आणि गेमिंग चालू ठेवणे किंवा वाढवणे याद्वारे वैशिष्ट्यीकृत केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com