Video: एका 44 वर्षीय व्यक्तीने केले बकरीशी लग्न, कारण ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल

5 जून रोजी या व्यक्तीने पारंपरिक विधीसह बकरीशी विवाह केला.
viral video
viral videosakal

सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल असतात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणारे असतात. असाच एक आश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ समोर आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क बकरीशी लग्ल केले. (Indonesian Man Marries Female Goat To Become Famous On Social Media)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या व्यक्तीवर टीका करत आहे. हा व्यक्ती इंडोनेशिया येथील असून याचे नाव सैफुल आरिफ आहे.

viral video
परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जपानची दारे खुली

या व्हिडीओत हा व्यक्ती बकरीशी लग्न करत आहे. तर विशेष म्हणजे या व्यक्तीचे नातेवाईक आणि गावकरीही या लग्नाला उपस्थित असल्याचे दिसतंय. 5 जून रोजी त्याने पारंपरिक विधीसह बकरीशी विवाह केला. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा नेटकरी त्याच्यावर टीका करत होते. वाढता विरोध पाहून या व्यक्तीने या लग्नामागे कारण सांगितले आहे जे ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल.

सोशल मीडीयावर आपण ट्रोल होत असल्याचे पाहून या व्यक्तीने आपण हा व्हिडीओ गमतीने बनवला असल्याचे सांगितले. हा एक अभिनयाचा भाग असल्याचे म्हणाला. फक्त फेमस होण्यासाठी हे लग्न केले असल्याचे तो म्हणाला.

viral video
एक चतुर्थांश लंकेसमोर अन्नटंचाईचे संकट!

नुकतेच काही दिवसाआधी गुजरातमधील क्षमा बिंदू स्वतःशी लग्न करून चर्चेत आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आ व्यक्तीने चक्क बकरीशी लग्न केल्याने हे प्रकरणही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com