क्रुरतेचा कळस! महिलेने पाळीव कुत्र्यांंवर झाडल्या तब्बल १७० गोळ्या |Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

क्रुरतेचा कळस! महिलेने पाळीव कुत्र्यांंवर झाडल्या तब्बल १७० गोळ्या

असे म्हणतात की कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे आणि माणसाचा सर्वात चांगला मित्र देखील आहे. पण माणसाला माणसाची किंमत नसते, तर मुक्या प्राण्यांची काय असणार, या गोष्टीचा प्रत्यय आलाय एका महिलेच्या कृत्यावरुन. या महिलेने तीच्या पाळीव कुत्र्यांवर १७० वेळा एअर गनने गोळ्या झाडल्या. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या महिलेला अटक केली. (a woman shot two of her dogs more than 170 times)

हेही वाचा: New York : सुपरमार्केटमध्ये गोळीबार, १० जण ठार; आरोपीने केला Live Video

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी 37 वर्षीय जेमी लिन कुजावा हिने तिच्या तीन पाळीव कुत्र्यांवर १७० गोळ्या झाडल्या. या जेमी नावाच्या महिलेकडे 3 पाळीव कुत्री, एक मांजर, एक फेरेट आणि एक चिमणी होती.

तिच्या शेजाऱ्यांनी गेल्या महिन्यात 19 एप्रिलला तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. जेमीच्या घरातून कुत्र्यांचा ओरडण्याचा आवाज येत होता. या तक्रारी वरुन प्राणी नियंत्रण अधिकारी महिलेच्या घरी आले असता एअर गनबाबत चौकशी केली. त्यावेळी तीने आपल्याजवळ बंदूक असल्याचे स्पष्टपणे नाकारले.

तिने सांगितले की तीन कुत्र्यांच्या शरीरावर दिसणाऱ्या जखमा त्यांच्या आपापसात भांडणनंतरच्या होत्या. जेव्हा ती महिला तिच्या कुत्र्यांच्या लसीकरणाची माहिती देऊ शकली नाही तेव्हा प्राणी नियंत्रण अधिकारी यांना महिलेवर संशय आला. अधिकारी पुन्हा आले तेव्हा त्यांना पुन्हा कुत्र्यांच्या पायावर ताज्या जखमा दिसल्या.त्यांनी तपासण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांना इतका त्रास होत होता की ते त्यांच्या पायालाही हात लावू देत नव्हते.यांनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

हेही वाचा: युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे मानले आभार

या घटनेने एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या प्रकरणावरुन नेटकरी महिलेविरोधात रोष व्यक्त करत आहे.सध्या पोलिसांनी तीला अटक केली असून गुन्हा सिद्ध झाल्यास तिला पाच वर्षाचा तुरुंगवास होणार आणि ३८ लाख दंड भरावा लागेल.

Web Title: A Woman Shot Two Of Her Dogs More Than 170 Times

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top