जीमचा नाद महागात पडला! तरुणाला कापावा लागला हात

जीमच्या नादात तरुणाला एक चूक चांगलीच महागात पडली.
weightlifting
weightliftingviral

जीम हा तरुणाईमध्ये आवडीचा विषय आहे. अनेकांना जीममध्ये जावून एक्सरसाइझ करायला आवडतं. या जीमच्या नादात अनेक तरुण मंडळी नको त्या गोष्टी करायलाही मागेपुढं पाहत नाही आणि मग नको त्या गोष्टीला सामोरे जातात.

असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियातील 29 वर्षांच्या तरुणासोबत घडला. जीमच्या नादात त्याला एक चुक चांगलीच महागात पडली. ही चुक इतकी भयानक होती की त्याला स्वत:चा हात गमवावा लागला.

weightlifting
तुर्कस्तानचे नामकरण : आता ओळखले जाणार ‘या’ नावाने; जाणून घ्या...

ऑस्ट्रेलियात एडिलेडमधील राहणारागेब्रिअल मॅककेना लिस्चके याला जीमची प्रचंड आवड होती. गेब्रिअलने जिममध्ये हेव्ही वेटलिफ्टिंग करायचा पण एकदिवस वेट लिफ्टींग करताना अचानक त्याच्या हातातील मसल्स मोडल्या आणि त्याला अचानक असह्य वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सर्जरी झाली आणि ऑपरेशन करून त्याचे बाइसेप्स पुन्हा जोडण्यात आले.

डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवसांनी त्याचा हात लाल झाला आणि हाताला सूज आली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर डॉक्टरांना त्याचा हातच कापावा लागला.

weightlifting
निवडणूक न झाल्यास यादवी : इम्रान खान

गॅब्रिअलला एक खराब मांस खाण्याची सवय होती त्यामुळे त्याला बॅक्टेरिअल इन्फेक्शन झालं होतं. १० दिवसानंतर तो शुद्धीवर आल्यावर त्याचा हात कापला असल्याचे दिसताच त्याला धक्काच बसला.

नोव्हेंबर 2020 मधील ही घटना असून गॅब्रिअल स्वत:ला यातून सावरत आहे मात्र तो हिंमत हरला नाही. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकसाठी तो सध्या तयारी करतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com