esakal | माझा 'तो' व्हिडिओ अर्धवट : आफ्रिदी
sakal

बोलून बातमी शोधा

माझा 'तो' व्हिडिओ अर्धवट : आफ्रिदी

माझा 'तो' व्हिडिओ अर्धवट : आफ्रिदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''माझा व्हिडिओ अर्धवट दाखविण्यात आला आहे. काश्मीरबाबत ज्या पार्श्वभूमीवर मी हे वक्तव्य केले होते, तो अर्थच व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला नाही. काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे'', असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ट्विटरवरून सांगितले. 

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने माध्यमांशी बोलताना काश्मीरबाबत वक्तव्य केले होते. आफ्रिदीच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याने ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिले. आफ्रिदी म्हणाला, ''सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला व्हिडीओ अपूर्ण आहे. काश्मीरबाबत मी ज्या पार्श्वभूमीवर केले होते, तो अर्थच या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला नाही. काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे. भारताच्या जुलमी सत्तेखाली काश्मीरचे लोक राहत आहेत. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे''.

डाऊनलोड करा 'सकाळ'चे अॅप आणि वाचा बातम्या मोबाईलवर

काय म्हणाला होता आफ्रिदी

''पाकिस्तानला काश्मीरबाबत काळजी करण्याची गरज नाही. पाकिस्तानकडून चार प्रांत सांभाळले जात नाही. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरबाबत चिंता करु नये''.

loading image