हिच का आमची जागा?: पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई : 'हिंदी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल सबाने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संशयास्पद नजरांमुळे अवमानकारक वाटत असल्याचे सबाने म्हटले आहे. आपण पाकिस्तानी अभिनेत्री असल्यामुळे चेकिंग करताना हा जाच सहन करावा लागतो, असा दावा तिने केला. हा अनुभव सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

युरेशियन जॉर्जियाची राजधानी तबलिसीला गेले असतानाचा अनुभवही तिने शेअर केला आहे. ''आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तबलिसीला गेलो होतो. तेव्हा विमानतळावर माझ्याबरोबरच्या सर्व भारतीय कलाकारंना पुढे पाठवण्यात आले, मला मात्र अडवले. कारण माझा पासपोर्ट पाकिस्तानी होता. त्यांनी पूर्ण तपास केला. माझी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच मला पुढे जाण्याची परवानगी मिळाल्याचे सबाने सांगितले

व्हिडिओ सौजन्य - A Plus Entertainment youyube

''त्या दिवशी मला आमची खरी जागा समजली. जगात आमचं काय स्थान आहे?'' असा प्रश्न सबाने या व्हिडिओमध्ये उपस्थित केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Saba Qamar Says She Was Stopped At An Airport, Allegedly Because She's Pakistani