'आदिदास'ने ट्रेडमार्क गमावला

Adidas
Adidas

लक्‍झेंबर्ग : क्रीडा साहित्य निर्मितीतील जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आदिदासला मोठा झटका बसला आहे. अल्पावधीत "आदिदास'ची ओळख बनलेला तीन पट्ट्या असलेला ट्रेडमार्क (व्यापारी चिन्ह) "आदिदास'ला गमवावा लागला आहे. बेल्जियममधील एका कंपनीच्या दाव्यावर युरोपीय युनियन जनरल कोर्टाने "आदिदास'चा ट्रेडमार्क अवैध असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे युरोपातील 28 देशांसाठी आता "आदिदास'ला उत्पादनांकरिता नव्याने ट्रेडमार्क तयार करावा लागणार आहे.

क्रीडा साहित्य उत्पादनात स्वत:ची वेगळी आणि हटके ओळख निर्माण करण्यासाठी कंपन्यांमध्ये चुरस आहे. ट्रेडमार्क (व्यापारी चिन्ह) आणि पेटंट (विशेष हक्क) संदर्भात आघाडीच्या कंपन्यांचे शेकडो दावे युरोप आणि अमेरिकेतील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यापैकी एका प्रकरणात युरोपीयन युनियन जनरल कोर्टाने "आदिदास'चा तीन पट्ट्यांचा ट्रेडमार्क बुधवारी (ता. 19) अवैध ठरवला. बेल्जियममधील "शू ब्रॅंडिंग' या कंपनीने "आदिदास'च्या ट्रेडमार्कला आव्हान दिले होते. तब्बल दहा वर्षे हा खटला चालला होता. कोर्टाने शू ब्रॅंडिंगचा दोन पट्ट्या असलेले व्यापारी चिन्ह अवैध ठरवले होते. हे चिन्ह आदिदासच्या व्यापारी चिन्हाशी मिळतेजुळते असल्याचे कोर्टाने म्हटले होते. मात्र शू ब्रॅंडिंगने युरोपातील सर्वांत जुना स्पोर्टस ब्रॅंड असलेल्या "पॅट्रिक"वर ताबा मिळवला.

पॅट्रिक ब्रॅंड युरोपात 1892 पासून असून, त्याचे दोन पट्ट्या असलेले व्यापारी चिन्ह आहे, असा दावा शू ब्रॅंडिंगेन कोर्टात केला. यावर आदिदासला व्यापारी चिन्ह कसे वैशिष्टपूर्ण आहे, हे पुरव्यांसह सिद्ध करण्याचे कोर्टाने आदेश दिले. मात्र त्यात अपयशी ठरल्याने कोर्टाने "आदिदास"चा तीन पट्ट्यांचा ट्रेडमार्क अवैध ठरवला. दरम्यान, या निर्णयाविरोधात आव्हान देणार असल्याचे आदिदासच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com