घरावरून जाणाऱ्या विमानातून पडली किळसवाणी गोष्ट...

या विचित्र प्रकारामुळे या व्यक्तीला मोठा त्रास सहन करवा लागला.
Plane
PlaneTeam eSakal

विमान आणि विमान प्रवासाशी संबंधीत वेगवेळ्या गोष्टींचं सर्वांनाच आकर्षण असतं. मात्र अमेरिकेत विमानाच्या बाबतीतला एक वेगळाच किस्सा समोर आलांय. विमानातून पडलेल्या विष्ठेमुळे एका अमेरिकन नागरिकाला मोठा त्रास सहन करावा लागला. घरावरून विमान जात असताना काही तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली.

विमानातून पडलेल्या विष्ठेमुळे माझ्या घराची संपुर्ण, बाहेतील वस्तू घाण झाल्यात. माझ्या अंगावर सुद्धा ही घाण पडली. असं या व्यक्तीनं सांगितलंय. तसंच पुढे ती व्यक्ती असंही म्हणाली की, मला माहित आहे की विमान गोठलेल्या मलमुत्रामुळे दरवर्षी अशा अनेक घटना घडतात, परंतु हे मलमुत्र गोठलेलं नव्हतं. त्यामुळं आपली सगळी बाग खराब झाली. तर ही घटना घडली तेव्हा आपण स्वत: देखील बागेत उपस्थित होतो. हा अनुभव खरंच वाईट होता."

Plane
नेपाळमध्ये हाहाकार; महापुरात 77 ठार, तर डझनभर बेपत्ता

विमानातील मलमुत्र हे एका विशिष्ठ टाकीमध्ये साठवलं जात असतं. विमान लँड झाल्यावर या मलमुत्राची विल्हेवाट लावली जात असते. न्यूजवीकने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेला जबाबदार असलेल्या विमान कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, ज्या व्यक्तीला या प्रकाराला सामोरे जावे लागले त्याने एअरलाईनविरूद्ध विम्याचा दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com