अफगाणिस्तानात 26 सैनिक ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

सैन्यदलाच्या तळावर तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला

कंदहार: अफगाणिस्तानातील कंदहार प्रांतातील सैन्यतळावर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 सैनिक मृत्युमुखी पडले असून, 13 जण जखमी झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली. अफगाणिस्तानच्या सैन्यदलावर करण्यात आलेला हा मोठा हल्ला आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कंदहार प्रांतातील खाकरेझ जिल्ह्यातील करझाली येथील सैन्यदलाच्या तळावर मंगळवारी (ता. 25) रात्री तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याला अफगाण सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात 80 दहशतवादी ठार झाले. सुमारे 26 अफगाण सैनिक मृत्युमुखी पडले असून, 13 जण जखमी झाले, अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते जनरल दौलत वझिरी यांनी दिली.

सैन्यतळावर चहुबाजूंनी तालिबानी दहशतवाद्यांनी एकाच वेळी हल्ला केला. सुमारे तीस वाहनांमध्ये शेकडो दहशतवादी आले होते. हा हल्ला काही तास सुरू होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हल्ला झाल्यानंतर हवाई दलाची मदत मागविण्यात आली होती.
डिसेंबर 2014 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील "नाटो'च्या फौजांना माघारी बोलविण्यात आल्यानंतर अफगाणिस्तानची सैन्यदले काही प्रमाणात कमकुवत झाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे अफगाण सैन्यदलांवरील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Web Title: afganistan news 26 soldier killed