काबूलमध्ये तालिबानच्या स्फोटात 35 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

काबूल: तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमध्ये आज घडवून आणलेल्या कार बॉंबच्या स्फोटात सुमारे 35 जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. शिया मुस्लिम राहात असलेल्या भागात हा बॉंबस्फोट झाला.

काबूलमधील पश्‍चिमेकडील भागात असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानाजवळ आज बॉंबस्फोट झाला. आत्मघाती दहशतवाद्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत बॉंबस्फोट घडवून आणला असल्याचे सांगण्यात आले. चालू वर्षी आफगाणिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे एक हजार सातशे सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे तालिबानकडून दहशतवादी हल्ले केले जात आहेत.

आज झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात सुमारे 35 जण ठार झाले असून, 40 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आजच्या स्फोटात तीन वाहने आणि 15 दुकाने जळून खाक झाली, असे प्रवक्‍त्याने सांगितले.

Web Title: afganistan news blast in kabul