अफगाणिस्तानात पाकने राजकीय कौशल्य वापरावे : मॅकमास्टर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

अफगाणिस्तानातील दहशतवादी गटांवर कारवाई करताना पाकिस्तानकडून भेदभाव होत असून, पाकिस्तानने आपला हेतू साध्य करण्यासाठी छुप्या नीतीऐवजी राजकीय कौशल्याचा वापर करावा, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी केले. 

न्यूयॉर्क- अफगाणिस्तानातील दहशतवादी गटांवर कारवाई करताना पाकिस्तानकडून भेदभाव होत असून, पाकिस्तानने आपला हेतू साध्य करण्यासाठी छुप्या नीतीऐवजी राजकीय कौशल्याचा वापर करावा, असे प्रतिपादन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी केले. 

अफगाणिस्तानातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पाक तालिबानी दहशतवाद्यांना अभय देऊन इतर दहशतवादी गटांवर कारवाया करत आहे. ही बाब पाकिस्तानी नेत्यांनी लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा सर्वांना अनेक वर्षांपासून आहे. पाकने अफगाणिस्तान किंवा अन्य कोणत्या देशाशी निगडीत हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादी गटांना छुपा पाठिंबा देणे थांबवून त्यासाठी आपले राजनैतिक कौशल्य वापरावे, असे मॅकमास्टर यांनी आपल्या अफगाणिस्तान दौऱ्यात म्हटले होते. 

याबाबत टाइम्सने दिलेल्या एका वृत्तात पाकचे समर्थन असलेल्या दहशतवादी गटांकडूनच अफगाणिस्तानला खरा धोका असून, अमेरिकेकडून पाकला मिळणारी मित्रत्वाची वागणूक बंद होणे महत्त्वाचे असल्याचे नमूद होते. 
 

Web Title: Afganistan-Pak should fight against terror