कराची वकिलातीत अफगाण अधिकाऱ्याची हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

कराची- अफगाणिस्तानच्या कराची येथील वकिलातीमध्ये एका सुरक्षारक्षकाने अफगाण राजनैतिक अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. 

मृत्युमुखी पडलेला अधिकारी हा या वकिलातीचा तृतीय सचिव असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. इस्लामाबादमधील अफगाण दुतावासाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात मृत अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, हल्ला करणारा खासगी सुरक्षारक्षक हा अफगाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली. त्या दोघांमध्ये वाद झाल्याने सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
Web Title: Afghan diplomat shot dead inside Karachi consulate