अफगाणिस्तानमध्ये कार बॉंबस्फोटात 29 जण ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

रमजान सणाच्या पार्श्वभूमिवर महिन्याचा पगार काढण्यासाठी अफगाण लष्करातील सैनिक, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी येथील न्यू काबूल बॅंकेच्या शाखेसमोर गर्दी केली होती. ही संधी साधून एका कारद्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आला

लष्कर गाह - शहरातील न्यू काबूल बॅंकेबाहेर घडवून आणलेल्या एका कार बॉंबस्फोटात 29 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात इतर 60 जण जखमी झाले असून, यात लष्करातील काही सैनिकांचा समावेश असल्याची माहिती सरकारच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

रमजान सणाच्या पार्श्वभूमिवर महिन्याचा पगार काढण्यासाठी अफगाण लष्करातील सैनिक, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी येथील न्यू काबूल बॅंकेच्या शाखेसमोर गर्दी केली होती. ही संधी साधून एका कारद्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसून, यामागे तालिबानी व इसिस या दहशतवादी संघटनांचा हात असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यात सहाजण ठार झाले होते.

. . . . . .

Web Title: Afghanistan: 29 dead in a blast