esakal | तालिबानचा प्रमुख नेता 'हिबतुल्लाह अखुंदजादा' कोण आहे? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Hibatullah akhundzada

तालिबानचा प्रमुख नेता 'हिबतुल्लाह अखुंदजादा' कोण आहे? जाणून घ्या

sakal_logo
By
सुधीर काकडे

अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानचे वेगवेगळे प्रवक्ते तालिबानची भुमिका मांडताना दिसत होते. मात्र तालिबानचा प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादा हा माध्यमांसमोर आल्याचे पहायत मिळत नव्हते. त्यातच आता तालिबानने (Taliban) हिबतुल्लाह अखुंदजादा हा आपला प्रमुख नेता असल्याचे घोषित केले आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या हवाल्याने, तालिबान नेता ईनामुल्लाह समनगनीने स्पष्ट केले की, हिबतुल्लाह अखुंदजादा (Hibatullah akhundzada) हाच तालिबान प्रमुख आहे. तालिबान लवकरच सरकार स्थापन करणार असून, त्यासाठी सुरु असलेल्या हालचालींना आता वेग आला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशातील अनेक लोकांनी देश सोडला आहे, तर अजूनही अनेक लोक देश सोडण्याचा प्रयत्न करता आहेत. तर दुसरीकडे तालिबानी सत्ता स्थापनेसाठी तयारी करता आहेत. काही दिवसांपुर्वी तालिबानने हिबतुल्लाह अखुंदजादा हा आपला प्रमुख नेता असून अफगाणिस्तानवरील तालिबानच्या सरकारमध्येही त्याचे महत्वाचे स्थान असेल असे स्पष्ट केले होते.

हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कंधारमध्ये बैठका घेतल्याचेही द न्युयॉर्क टाईम्सच्या एका वृत्तामधून समोर आले होते. हिबतुल्लाह अखुंदजादा हा आगामी सरकारच्या महत्वाच्या पदावर असेल अशी माहिती तालिबानच्या कल्चरल कमीशनचा नेता बीलाल करिमी याने एका स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

कोण आहे हिबतुल्लाह अखुंदजादा?

२०१६ मध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबानी नेता अख्तर मन्सुर याचा मृत्यू झाल्यानंतर हिबतुल्लाह अखुंदजादाची तालिबान प्रमुख पदी नियुक्ती झाली. हिबतुल्लाह अखुंदजादाचा जन्म हा कंधार जवळच्या पांजवायी गावात झाला आणि मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेत तिथेच तो मोठा झाला. त्यानंतर सोव्हिएतने केलेल्या आक्रमणानंतर त्याचे कुटूंब बलुचिस्तानमध्ये स्थलांतरित झाले.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

१९८० मध्ये हिबतुल्लाह अखुंदजादा सोव्हिएत विरुद्ध स्थानिक तरुणांकडून सुरु केलेल्या इस्लामिक रेझिस्टन्समध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याने मदरशामधील आपले शिक्षण पाकिस्तानमध्ये पुर्ण केले. आपले धार्मिक शिक्षण पूर्ण करत तो तालिबानचा संस्थापक मुल्लाह मोहम्मद ओमरचा धार्मिक सल्लागार झाला.

सोव्हिएत सैन्याच्या माघारीनंतर १९९० च्या दशकात तो तालिबानच्या संपर्कात आला. त्याच्या धार्मिक ज्ञानामुळे तो लष्करी कमांडर कमी आणि धार्मिक गुरु म्हणुन जास्त ओळखला जाऊ लागला. पुढे तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानच्या फराह प्रांतावर ताबा मिळवला तेव्हा त्याला त्या प्रांताची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली.

2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर तालिबानला माघार घ्यावी लागली. या घटनेच्या काही काळानंतर अखुंदजादाला धार्मिक परिषदेचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे २०१६ मध्ये त्याच्याकडे तालिबानच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. या संपुर्ण काळात तो फार कमी वेळा लोकांसमोर आला नाही. लोकांशी त्यांचा संबंध फक्त इस्लामिक सुट्टया जाहीर करणयापुर्ताच आला आहे.

loading image
go to top