Afghanistan : उपराज्यपालांच्या शोकसभेदरम्यान स्फोट! १५ जण ठार, अनेकजण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb explodes in Afghanistan (AFP photo)

Afghanistan : उपराज्यपालांच्या शोकसभेदरम्यान स्फोट! १५ जण ठार, अनेकजण जखमी

Afghanistan : अफगाणिस्तानमधील तालिबान उपराज्यपालांच्या शोकसभेदरम्यान मोठा स्फोट झाला. यामध्ये १५ जण ठार झाले आहेत तर २० जण जखमी आहे. गेल्या आठवड्यात एका हल्ल्यात उपराज्यपाल मारले गेले. त्यांच्यासाठीच शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट झाला.

बदख्शानचे उपराज्यपाल मौलवी निसार अहमद अहमदी यांच्या शोकसभेवेळी नबावी मशिदीजवळ हा स्फोट झाला. बदख्शानची राजधानी फैजाबाद येथे मंगळवारी कार बॉम्ब स्फोटात त्यांचा ड्रायव्हरसह मृत्यू झाला होता.

माहिती आणि संस्कृतीचे प्रांतीय संचालक मोझुद्दीन अहमदी यांनी आज झालेल्या स्फोटाला दुजोरा दिला. मात्र, त्यांनी या घटनेबाबत इतर कोणतीही माहिती दिली नाही.

तालिबानी अधिकारी आणि स्थानिक लोक शोक समारंभात सहभागी होत असलेल्या मशिदीच्या आत स्फोट झाला. इस्लामिक स्टेट गटाने मंगळवारच्या कार बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली ज्यात उपराज्यपाल आणि त्यांचा ड्रायव्हर ठार झाला.