अफगाणिस्तानात जर्मन दुतावासाजवळ दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

काबूल- अफगणिस्तानमधील जर्मन दुतावासाजवळ आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात चार ठार तर 115 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

अफगाणिस्तानमधील मझार-आय-शरीफ या शहरात असले्लया जर्मन दुतावासाजवळ गुरुवारी (ता. 10) रात्री 11.10 वाजता दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्यांच्या मदतीने हा स्फोट घडवला आणला. या स्फोटात दुतावासाचे नुकसान झाले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

डॉ. नूर मोहम्मद फैज यांनी सांगितले की, 'स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांपैकी दोन स्थानिक नागरिक आहेत तर अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.'

दरम्यान, गेल्या आठवड्यात नाटो सैन्याने अफगाणमधील दुर्गम भागात हवाई हल्ले केले होते. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याचे तालिबानने म्हटले आहे.

Web Title: Afghanistan: Taliban attack German consulate