... तरच महिलांना ७२ किमीपेक्षा जास्तीचा प्रवास करता येईल

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लोकांना वाहनांमध्ये संगीत वाजवणे थांबवण्यासही सांगण्यात आले आहे
Afghanistan
AfghanistanEsaka

अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) माघारीनंतर महिलांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. आधी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि आता लांबच्या प्रवासाला निघालेल्या महिलांबाबत तालिबानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. खरं तर अफगाणिस्तानमधील तालिबान अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांना जवळचा पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही.

शिष्टाचाराशी संबंधित मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, सर्व वाहनधारकांना केवळ हिजाब परिधान केलेल्या महिलांना बसण्याची सूचना देण्यात आली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी रविवारी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले, ७२ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक नसतील तर प्रवासाला परवानगी देऊ नका.

Afghanistan
Foreign Liquor : स्वस्त दरातील विदेशी मद्य नव वर्षापूर्वीच बाजारात!

सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (New guidelines) लोकांना वाहनांमध्ये संगीत वाजवणे थांबवण्यासही सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दूरचित्रवाणी वाहिन्यांना महिलांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय महिला न्यूज अँकरना स्कार्फ घालण्यास सांगितले होते. मुहाजिर यांनी रविवारी सांगितले की, हिजाब (Hijab required) हा इस्लामिक निकाब आहे आणि सर्व महिलांना प्रवास करताना तो परिधान करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com