त्यांच्या घरात होतं 10 कोटी किमतीचं पेंटिंग..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आपल्याला नॉर्मली आपल्या घरातील गोष्टींची किंमत माहित असते. त्यातही, आपल्या घरात अश्या काही गोष्टी असतात ज्या एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनला पुढे दिल्या जातात. अश्या जुन्या पण किमती गोष्टींची आपण मनापासून काळजी घेतो. तुमच्या आमच्या सगळ्यांकडे अश्या वस्तू, गोष्टी असतातच. पण तुमच्याबरोबर असं कधी झालंय का? की एखादी वस्तू तुम्हाला घरात अडगळ वाटते म्हणून तुम्ही विकायला काढली.. आणि याच गोष्टीला तुम्हाला ठाऊकही नसेल एव्हडी किमत मिळालीये..

असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासोबत घडलाय. या कुटुंबाच्या घरात एक पेंटिंग लावलेलं होतं अनेक वर्ष हे पेंटिंग त्यांच्या भिंतीवर होतं. त्याना त्याच्या किमतीबद्दल काहीच माहिती नव्हती. एकदा सहज त्यांनी त्या पेंटिंग खालील सही गुगल करून पहिली. आणि त्यांना धक्का बसला. 

पेंटिंग होतं तरी कुणाचं ?

  • हे पेंटिंग एका नायजेरियन कलाकार बेन इनवॉनवूने यांनी 1971 मध्ये लागोसमध्ये रेखाटलं 
  • हे पेंटिंग आहे 'आफ्रिकन मोनालिसा'चं 
  • या पेंटिंगचं नाव आहे 'क्रिस्टीनी' 
  • या पेंटिंगमध्ये इफिची राजकुमारी एडीतुतुचं चित्र काढण्यात आलं होतं

1971 पासून या परिवाराकडे हे 'क्रिस्टीनी' म्हणजेच 'आफ्रिकन मोनालिसा'चं पेंटिंग होतं. या पेंटिंगवरील सही या कुटुंबाने सर्च केल्यावर त्यांना सुखद धक्का बसला. या पेंटीगची किंमत तब्बल 11 लाख पाउंड म्हणजेच 10 कोटी रुपये आहे.      

लंडनमधील हाउस सोथेबी या लिलाव संस्थेवरून या कुटुंबाला अंदाजापेक्षा तब्बल सात पट जास्त किंमत मिळालीये. बुकर पुरस्कार विजेते बेन ओकरी यांच्या माहितीनुसार हे पेंटिंग म्हणजे एका राष्ट्रीय प्रतिक मानलं जातं. हे पेंटिंग नायजेरिया-बियाप्रान संघर्षादरम्यान शांतीचं प्रतिक बनली होती.  

आता सगळी गोष्ट तर तुम्हाला समजली, तुमच्याकडे जर कशी अशा वस्तू , पेंटिंग किंवा हिरा वगैरे असेल तर जरा गुगल करून पाहा. काय माहित तुमचं पण नशीब उजळेल.

WebTitle : African Mona Lisa Sells for Over Rs 10 Crore at Auction After Family Googled the Signature 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: African Mona Lisa Sells for Over Rs 10 Crore at Auction After Family Googled the Signature