'स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर'

'स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर'

लंडन : सुषमा स्वराज, अरुण जेटलींनंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांचा क्रमांक असल्याचे वादग्रस्त ट्विट ब्रिटिश मुस्लिम खासदार लॉर्ड नजीर अहमद यांनी केले आहे.

ब्रिटिश संसदेतील वरिष्ठ सदनातील लॉर्ड हे आजीवन सदस्य आहेत. त्यांनी केलेल्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त ट्विटमुळे आज ते चांगलेच चर्चेत आले. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा एका वर्षाच्या आत मृत्यू झाला असून यानंतरचा क्रमांक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे.
 


मूळ पाकिस्‍तानी असलेल्या लॉर्ड नजीर अहमद यांनी ट्वीट करत हे विधान केले आहे. नजीर अहमद यांच्या या वादग्रस्त ट्विटनंतर ट्विटरवर नेटीझन्सनी या गोष्टीचा निषेध करायला सुरवात केली असून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही या ट्विटची दखल घेत म्हटले आहे की, अशा प्रकारे ब्रिटिशांनी आपली बुद्धी दाखवायला सुरवात केली असून मला कळत नाहीये की पृथ्वीवर अशा प्रकारचे लोक कसे राहतात. अशा लोकांना तुम्ही सदस्यत्व तरी कसे देता असा प्रश्नही त्यांनी यावेळी ब्रिटीश संसदेला केला आहे.

दरम्यान, लॉर्ड नजीर अहमद यांनी भाजपच्या खासदार असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत हे वक्तव्य केले आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते की, विरोधक जादूटोणा करत असल्यानेच भाजपचे नेत्यांचे निधन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com