America: कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलियोची भीती; Pool अन् Restaurants बंद, अलर्ट जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

America: Polio Alert

America: कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद, अलर्ट जारी

New-York Alert: अमेरिकेत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता एका संसर्गाचा धोका वाढलाय. न्यूयॉर्कमध्ये पोलिओचे रग्ण वाढल्यानंतर आता शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी न्यूयॉर्कमध्ये पोलिओ व्हॅक्सिनेशन वाढवण्याचे आदेश दिले असून शहरात अपात्कालिन स्थिती घोषित करण्यात आली आहे. सोबतच अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून पोलिओ व्हायरस फार घातक असल्याचं सांगितल्या जातंय. तूर्तास निष्काळजीपणामुळे येत्या दिवसांत या रोगाने लोकांचा मृत्यू होण्याचाही धोका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पोलियो व्हायरल हा लहान मुलांसाठी सगळ्यात घातक असून या व्हायरसवर केवळ व्हॅक्सिनच्या मदतीनेच नियंत्रण ठेवता येऊ शकतं.

हेही वाचा: Polio vaccine: रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना पोलिओ डोस

या व्हायरचा आतापर्यंत एकच रूग्ण सापडला असून ९ वर्षांत मिळालेला हा पहिलाच रूग्ण होता. त्यामुळे शहरात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जारी करून पूल आणि उपहारगृहे बंद ठेवण्यात आले आहेत. माहितीप्रमाणे ९ ऑक्टोबरला अपात्कालिन परिस्थिती (इमर्जंसी) हटवण्यात येईल. या कालावधीदरम्यान संपूर्ण ठिकाणी पोलिओ व्हॅक्सिनचे डोज सर्वांना देण्याचं धोरण राबवण्यात येईल.

हेही वाचा: America : केंटकीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळं 16 जणांचा मृत्यू

अमेरिकेत १९५२ मध्ये पसरला होता पोलियो

पोलिओ व्हॅक्सिन सुरू होण्याआधी १९५२ मध्ये अमेरिकेमध्ये पोलियोचे ५८००० रूग्ण मिळाले होते. तर ३१४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक मुले अपंग झाले होते. त्यानंतर अमेरिकेत पोलिओविरोधात व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पोलिओच्या रूग्णांमध्ये घट झाली होती.

Web Title: After Corona Disease Polio Virus Tention In New York Pool Restaurant Closed Alert In City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..