कोरोनानंतर आता अमेरिकेत दंगलींचा भडका; जाळपोळ, गोळीबाराच्या घटना

वृत्तसंस्था
शनिवार, 30 मे 2020

जॉर्ज यांना गुडघ्याखाली दाबून धरणारे पोलिस अधिकारी डेरेक शोविन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जॉर्ज यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

मिनियापोलिस : कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देणाऱ्या अमेरिकेत आता आंदोलनाचा भडका उडाला असून जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने देशभर जनक्षोभाची मोठी लाट निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील विविध राज्यांत शनिवारी (ता.३०) लोकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. मिनियापोलिस शहरामध्येही आंदोलकांनी आज संचारबंदी धुडकावून लावत सरकार आणि यंत्रणेविरोधात निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी पोलीस तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्य शहरांमध्ये देखील हे आंदोलनाचे लोण पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे.

- ट्रम्प यांचा मोठा निर्णय; चीनची 'सलगी' करणाऱ्या WHO पासून अमेरिकेचे 'विलगिकरण'

दरम्यान, फ्लॉइड यांची मान दोन्ही गुडघ्यांच्या खाली दाबून धरणाऱ्या श्वेतवर्णीय डेरेक शोविन या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. आज आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. शहराच्या दक्षिण भागात आज आंदोलकांनी जाळपोळ केली, येथील एका जपानी रेस्टॉरंटलाची काही आंदोलकांनी आग लावली. मागील तीन ते चार दिवसांपासून या भागांत जाळपोळ सुरु आहे. 

- या देशात 10 हजार लोकांमागे 8 डॉक्टर; तरीही कोरोनाचा एकही बळी नाही!

निदर्शने तीव्र 
अमेरिकेत आज आफ्रिकी-अमेरिकी समुदायाने रस्त्यांवर उतरून विविध भागांत मोठे आंदोलन केले. काही आंदोलकांनी अटलांटामधील एक वृत्तवाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांच्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली. न्यूयॉर्क, ह्युस्टन आणि वॉशिंग्टनसह डझनभर शहरांत या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. 

अन्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 
जॉर्ज यांना गुडघ्याखाली दाबून धरणारे पोलिस अधिकारी डेरेक शोविन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जॉर्ज यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. डेरेक यांच्याबरोबर या मारहाणीत सहभागी असणाऱ्या अन्य चार पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ओकलंडमध्ये दोन फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. शक्रवारी रात्री आंदोलनादरम्यान ही घटना घडली. 

- चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेची नवी रणनिती, हजारो विद्यार्थांना बसणार फटका

आंदोलनाचा भडका 
- लिंकन, नेब्रास्कात आंदोलकांची धरपकड 
- फिनिक्समध्ये सार्वजनिक मालमत्तेची नासधूस 
- ह्यूस्टनमध्ये २०० आंदोलकांना पकडले 
- मिनियापोलिसमध्ये मोठा बंदोबस्त तैनात 
- पोर्टलॅंडमध्ये आंदोलकांविरोधात बळाचा वापर 
- डेट्रॉईटमध्ये गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the Coronavirus riots broke out in the United States of America