
ट्विटरच डील थांबताच पराग अग्रवाल 'अॅक्शन'मोडमध्ये
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क (elon musk) यांनी ट्विटर डील (twitter deal ) सध्या होल्डवर ठेवली आहे. ट्विटरचा ४४ अब्ज डॉलरचा करार सध्या होल्डवर आहे. अशा माहिती मस्क यांनी ट्विट करत दिली आहे. ट्विटर डील होल्डवर ठेवण्यामागील कारण स्पॅम खात्यांची गणना हे आहे. या घटनेनंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट केल आहे. त्यांनी त्यामध्ये पुर्ण घटनाक्रम शेअर करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
संपूर्ण घटनेबद्दल लिहिताना अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यात बरेच काही घडले आहे. पण मी फक्त कंपनीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि या दरम्यान मी जास्त सार्वजनिकपणे बोललो नाही, पण आता मी माझे म्हणणे सांगेन.
ते म्हणाले, "आम्ही काल आमच्या लीडरशिप टीम आणि ऑपरेशनमध्ये बदल जाहीर केले आहेत." बदल करणे लोकांसाठी नेहमीच कठीण असते, ज्या दरम्यान काही लोक 'कंपनी ताब्यात घेतली जात असताना एक अयशस्वी सीईओ कोणताही बदल का करेल.' असा सवाल उपस्थित करत आहेत.
हेही वाचा: ट्विटर डील तात्पुरती स्थगित; मस्क यांनी सांगितलं कारण
तसेच, मस्ककडून ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण होईल अशी मला मनापासून आशा आहे. अशा परिस्थितीत, आपण सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयार असणे आवश्यक आहे आणि आपण नेहमी ट्विटरसाठी जे योग्य आहे ते केले पाहिजे. मी ट्विटरचे नेतृत्व आणि चालवण्याची जबाबदारी घेतो आणि आमचे काम दररोज ट्विटरमध्ये चांगले बदल करणे हे आहे.
यासोबतच अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, ट्विटरचा कोणताही कर्मचारी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी काम करत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या कामाचा अभिमान आहे. असे वक्तव्य अग्रवाल यांनी केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, कंपनीच्या भविष्यातील मालकीकडे दुर्लक्ष करून, आम्ही ग्राहक, भागीदार, भागधारक आणि तुम्हा सर्वांसाठी ट्विटर एक उत्पादन आणि व्यवसाय म्हणून सुधारण्यासाठी येथे आहोत.
पराग अग्रवाल यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे की, मी अजूनही त्यांचे काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या काळात ते आवश्यकतेनुसार कठीण निर्णय घेण्यास पूर्णपणे मोकळे असतात. कंपनीच्या भल्यासाठी आपण यापुढेही बदल करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पॅम आणि बनावट खात्यांच्या संख्येमुळे डील थांबवली
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटर डील होल्ड करण्याबाबत माहिती देण्यासाठी ट्विट केले. यामागचे कारण म्हणून त्यांनी स्पॅम आणि बनावट खात्यांची संख्या सांगितली. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सांगितले की पहिल्या तिमाहीत, त्याच्या कमाई करण्यायोग्य दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमधील बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होती.
सोशल मीडिया कंपनीच्या पहिल्या तिमाहीत 22.90 दशलक्ष वापरकर्ते होते ज्यांना जाहिराती मिळाल्या होत्या. ट्विटर डीलनंतर एलोन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवरून 'स्पॅम बॉट्स' पूर्णपणे काढून टाकण्याविषयी सांगितले होते.
Web Title: After Stopping Elon Musk Twitter Deal Ceo Parag Agarwal Said Our Job Is To Force Twitter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..