नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी ती त्याच्याच मुलाची आई झाली? नेमकं काय होतं प्रकरण

नवऱ्याचा मृत्यूनंतर चक्क दोन वर्षांनी मृत नवऱ्यापासूनच एक महिला प्रेग्नंट झाली आणि मुलाला जन्म दिला.
Woman gives birth to her late husband's baby after two years after his death
Woman gives birth to her late husband's baby after two years after his deathsakal

नवऱ्याचा मृत्यूनंतर चक्क दोन वर्षांनी मृत नवऱ्यापासूनच एक महिला प्रेग्नंट झाली आणि मुलाला जन्म दिला. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे. पण खरंय आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तीच्या या अनोख्या प्रेग्नन्सीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. (Woman gives birth to her late husband's baby after two years after his death)

Woman gives birth to her late husband's baby after two years after his death
१५ वर्षांच्या मुलीने मृत्युपूर्वी डायरीत असं काय लिहिलयं जे आजही कोट्यवधी लोक वाचत आहेत?

लॉरेन मॅकग्रेगर असे या महिलेचे नाव आहे. ती यूकेतील लिव्हरपूल येथे राहते. तिचा नवरा क्रिसचा ब्रेन ट्युमरने अचानक दोन वर्षापुर्वी मृत्यू झाला होता.

क्रिसला मुल हवं होतं, ही त्याची शेवटची इच्छा पुर्ण करावी म्हणून त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षानंतर ल़ॉरेनने त्याच्यापासून झालेल्या एका गोंडस बाळाला जन्म दिलाय पण पतीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी ती कशी काय प्रेग्नंट राहू शकते, असे तुम्हाला वाटेल. पण सर्व शक्य झालंय टेक्नोलॉजींमुळे.

Woman gives birth to her late husband's baby after two years after his death
दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा

नवऱ्याचा मृत्यू झाला त्यावेळी लॉरेन प्रेग्नंट नव्हती. क्रिसच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी तिने आयव्हीएफमार्फत आई बनण्याचा निर्णय घेतला. क्रिसचे स्पर्म फ्रिज केले होते. ज्याचा वापर करुन ती त्याच्यापासून प्रेग्नंट झाली या वर्षी 17 मे ला पतीच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर लॉरेन त्याच्याच मुलाची आई झाली.

लॉरेनने तिच्या मुलाच नाव सेब ठेवलय. लॉरेनला सेब हा तिचा पती क्रिससारखाच वाटतो. ती म्हणते. सेब जन्मल्यानंतर त्याचे केस आणि डोकं क्रिससारखेच होते. क्रिसचे कितीतरी गुण त्याच्यात आहेत. त्यामुळे ती त्याला क्रिसही म्हणते. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com