कलम 370 विरोधात लंडनमध्ये फडकले काश्मिरी-पाकिस्तानी झेंडे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दिल्ली लाहोर बससेवा आणि चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. भारताच्या या निर्णयाविरोधात 15 ऑगस्ट रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयामोर प्रदर्शन करण्यात आलं.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गुरूवारी (ता. 15) लंडनमध्ये हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती घेऊन घोषणाबाजी केली. 

भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दिल्ली लाहोर बससेवा आणि चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. भारताच्या या निर्णयाविरोधात 15 ऑगस्ट रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयामोर प्रदर्शन करण्यात आलं.

यावेळी आंदोलकांनी ‘काश्मीर इज बर्निंग’, ‘फ्री काश्मीर’ आणि ‘मोदी: मेक टी नॉट वॉर’ अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केलं असल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली. परंतु हे छोटेसे आंदोलन होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against cancellation of section 370 in London