
AI Fraud : व्हिडिओ कॉलवर AI फेस स्वॅप करून ५ कोटींची फसवणूक, काय आहे प्रकरण?
AI Fraud : जगातील अनेक लोक कामे सोपे होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यासाठी नवीन शोध लावण्यात येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे देखील असेच एक तंत्रज्ञान आहे. याकडे क्रांती म्हणून पाहिले जात आहे पण या तंत्रज्ञानाचा गैरवापरही सुरू झाला आहे.
डीपफेक इमेज आणि व्हिडिओ टूल्स हे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमुख प्रकार बनत आहेत. याद्वारे चीनमध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहेत. चीनमध्ये एका व्यक्तीने डीपफेक तंत्राचा वापर करून ५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली.
डीपफेक म्हणजे बनावट डिजिटल चित्रे आणि व्हिडिओ, जे दिसायला अगदी खरे दिसतात. याद्वारे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उत्तर चीनमधील एका फसवणूक करणाऱ्याने 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीकडून त्याच्या खात्यात करोडो रुपये ट्रान्सफर केले. स्कॅमरने ही फसवणूक एआय-पावर्ड फेस-स्वॅपिंग तंत्राद्वारे केली.

पोलिसांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्याने पीडित मुलाच्या मित्राचा व्हिडिओ कॉलवर डीपफेक फोटो बनवला. त्यानंतर सुमारे ५ कोटी रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले.
पीडित मुलाने सांगितले की, त्याला वाटले की त्याच्या मित्राला पैशाची नितांत गरज आहे, म्हणून त्याने पैसे ट्रान्सफर केले. (global news)