Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग; अबूधाबीमध्ये केलं इमर्जन्सी लँडिंग

या विमानाने अबू धाबी येथून उड्डाण केले होते.
Air India
Air Indiasakal

अबू धाबी : अबू धाबी येथे एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला हवेतंच आग लागल्याची घटना घडली आहे. अबू धाबी येथून कलिकट येथे येण्यासाठी या विमानाने उड्डाण केले होते. पण उड्डाण केल्यानंतर हवेत फक्त १ हजार फूट उंचीवर गेल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग लागली. त्यानंतर विमानाचे अबू धाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले गेले.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

अधिक माहितीनुसार, एअर इंडियाच्या B737-800 VT-AYC ऑपरेटिंग फ्लाइट IX 348च्या एक नंबरच्या इंजिनला आग लागली. आग लागली त्यावेळी विमान हवेत जवळपास १ हजार फूट उंचीवर होते. पण त्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंग केले. या विमानातील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com