अल् कायदाचा नेता हवाई हल्ल्यात ठार

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये 20 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटाचा प्लॅन यासिननेच आखला होता. या स्फोटात अमेरिकन नागरिकांसह 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

वॉशिंग्टन - अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता कारी यासिन हा अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे, पॅन्टॉगॉनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पॅन्टॉगॉनने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील हॉटेलवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर 2009 मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणात यासिनचा सहभाग होता. या महिन्याच्या सुरवातीला अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतात अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तो तेहरिक-ए-पाकिस्तान संघटनेसोबत काम करत होता. त्याने अल् कायदासाठी अनेक हल्ल्याचे कट रचले होते. 

इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये 20 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटाचा प्लॅन यासिननेच आखला होता. या स्फोटात अमेरिकन नागरिकांसह 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच तो श्रीलंकेच्या क्रिकेट संघावरील हल्ल्यातही सहभागी होता. या हल्ल्यात सहा पोलिसांसह दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Al-Qaida leader Qari Yasin killed in Afghanistan airstrike: Pentagon