भारतीय मुस्लिमांनो, हल्ले घडवा: अल कायदा

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

नवी दिल्ली - बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतामधील मुस्लिमांनीही अशा स्वरुपाचे एकाकी दहशतवादी हल्ले (लोन वूल्फ ऍटॅक्‍स) घडविण्याचे आवाहन अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेने केले आहे. 

अल कायदाच्या भारतीय उपखंडामधील शाखेचा म्होरक्‍या असीम उमर याने यासंदर्भातील एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारतीय मुस्लिमांनीही युरोपमध्ये घडविल्या जात असलेल्या अशा स्वरुपाच्या हल्ल्यांपासून प्रेरणा घेऊन भारतामधील प्रशासक व पोलिस अधिकाऱ्यांना ठार मारावे, असे आवाहन उमरने केले आहे. 

अल कायदामध्ये भारतीय मुस्लिमांची भरती करण्यासाठी ही संघटना गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रयत्न करत असली; तरी यामध्ये संघटनेस विशेष यश मिळालेले नाही. मात्र "परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे‘ दहशतवादविरोधी पथकामधील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. "लोन वूल्फ‘ प्रकारासाठी अल कायदा फारशी प्रसिद्ध नसली; तरी आता इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या प्रभावास पायबंद घालून स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी ही संघटना या मार्गाचा अवलंब करत असल्यचे मानले जात आहे.

Web Title: Al Queda calls for Terror attacks in India