Alexander Graham Bell : फोन उचलल्यावर Hello बोलावं का? दोन शास्त्रज्ञांमध्ये झालं होतं भांडण l Alexander Graham Bell Birth Anniversary Hello on phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alexander Graham Bell

Alexander Graham Bell : फोन उचलल्यावर Hello बोलावं का? दोन शास्त्रज्ञांमध्ये झालं होतं भांडण

Alexander Graham Bell Birth Anniversary : अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलीफोन बनवण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी १८७६-७७ दरम्यान याचा शोध लावला होता. मोबाईल असू दे किंवा लँडलाइन फोन वाजताच रिसिव्ह करताच प्रत्येक जण हॅलो म्हणतो. मग तो गरिब असो, श्रीमंत असो, लहान किंवा ज्येष्ठ, स्त्री किंवा पुरुष कोणीही असो हॅलोच म्हटलं जातं. अगदी बहुतेक जगातल्या सगळ्याच देशांमध्ये. पण तुम्हाला माहितीये का फोन उचलल्यावर पहिल्यांदा काय बोलावं यावरून दोन शास्त्रज्ञांमध्ये भांडण झालं होतं. हॅलो बोलावं ही पहिली पसंती नव्हती.

अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी फोन उचलताच जो शब्द बोलला जावा म्हणून निवडलेला तो हॅलो हा शब्द नव्हता. फोन उचलताच पहिला शब्द अहॉय हा बोलला जावा असं बेल यांना वाटत होतं. हा डच शब्द असून याचा अर्थ हाय असा होतो. हा शब्द हॅलोच्या १०० वर्ष आधीपासून समोरच्याला अभिवादन करण्यासाठी वापरला जात होता. ते आपल्या पुर्ण आयुष्यभर तोच शब्द वापरण्यास तयार होते.

बेल ने सांगितलेला शब्द का नाकारला

पण हा शब्द फारच वेगळा वाटत होता. त्या काळी अभिवादन करण्यासाठी हॅलो शब्द वापरला जात नव्हता पण कोणाच लक्ष वेधून घ्यायचं असेल तर वापरला जात होता. जेव्हा टेलीफोनचा शोध लागला तेव्हा तो वॉकीटॉकीच्या स्वरुपात होता. बोलणं तर होऊ शकत होतं. पण कधी कोणी सतर्क होऊन ऐकायचे आहे. यासाठी लक्ष वेधलं जावं म्हणून थॉमस एडिसन यांनी हॅलो हा शब्द निवडला. आणि त्याचा प्रस्ताव ठेवला.

थॉमस एडिसनने दिला होता हॅलो शब्दाचा प्रस्ताव

एडिसनने पिट्सबर्ग मध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिंटींग टेलिग्राफ कंपनीच्या अध्यक्षांना हॅलो शब्दाचा वापर करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.त्याकाळाच्या सुरुवातीला फोन बुक्सनेपण हॅलो शब्दाला अभिवादन शब्द मानलं होतं. त्यामुळे तेव्हापासून फोन उचलताच हॅलो म्हटलं जातं. पण खरं तर हॅलो नंतर जे बोलणं होतं ते जास्त महत्वाचं असतं.

टॅग्स :phone