अलिबाबाची दिवाळी; 24 तासात 2 लाख 16 हजार कोटींची विक्री

वृत्तसंस्था
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या वर्षीचा एका दिवसाच्या विक्रीचा सर्वात मोठा विक्रम केला आहे. या कंपनीने सेल चालू केल्यानंतर पहिल्या पाच मिनीटांतच तब्बल 21600 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली.

चीन- चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या वर्षीचा एका दिवसाच्या विक्रीचा सर्वात मोठा विक्रम केला आहे. या कंपनीने सेल चालू केल्यानंतर पहिल्या पाच मिनीटांतच तब्बल 21600 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली.

अलीबाबाने एका दिवसात म्हणजे 24 तासात 300 कोटी डॉलर म्हणजेच 2 लाख 16 हजार कोटींची विक्रमी विक्री केली. कंपनीने विक्रीबाबतचा स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. गेल्या वर्षी कंपनीने 24 तासात 1 लाख 80 हजार कोटी रुपयांची विक्री करण्याचा विक्रम केला होता. अलीबाबा कंपनीचे संस्थापक जैक मा मोजणी सुरु असताना तेथे उपस्थित होते. या सेलमध्ये अॅप्पल आणि शाओमीसारख्या मोठ्या ब्रैंडची विक्री जास्त झाली आहे.

अलीबाबाच्या या सेलचे ग्राहक लॉस एंजेलिस, टोकयो आणि फ्रैंकफर्टमधीलसुद्धा होते. लोकांनी या सेलमध्ये डायपरपासून ते मोबाईलपर्यंत अशा प्रत्येक गोष्टीची खरेदी केली आहे. अलीबाबा, ई-कॉमर्स, रीटेल, फार्मा, आईटी, फाइनेंस, टूरिज्म आणि मीडिया एंड एंटरटेनमेंट सारख्या 37 कंपन्या अलीबाबा ग्रुपसोबत जोडलेल्या आहेत. यासोबतच, भारतातच्या पे-टीएम मॉल सोबतच जगातील मोठमोठ्या कंपन्यासोबत आलीबाबाची भागीदारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibaba Makes Record $30 Billion During 24 Hour Online Sale