
ऑस्ट्रेलियाच्या बीचवर सापडला मृत एलियन?
पृथ्वीवरील सजीवसृष्टी सोडून इतर ठिकाणी कुठे सजीवसृष्टी असावी का? याचं कुतूहल नेहमीच माणसाला राहिलेलं आहे. पृथ्वीवर एखादा एलियन आला तर? अशी कल्पना करुन अनेक चित्रपट आणि पुस्तकेही लिहली गेली आहेत. अशी कल्पना स्वप्नवत वाटत असली तरी पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर मानवासारखे जीव असूच शकत नाहीत, असंही आपण ठामपणे म्हणू शकत नाही. या साऱ्या चर्चा सातत्याने घडत असतातच. मात्र, आता ऑस्ट्रेलियाच्या बीचवर एलियनसारखा प्राणी आढळून आला आहे. (Alien)
हेही वाचा: दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग
हेही वाचा: दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग
ऑस्ट्रेलियाच्या बीचवर एका तरुणाला एक विचित्रपणे फुगलेला एक प्राणी आढळलेला आहे. त्याचं डोकं विकृत दिसतं तर शरीर बेढबपणे फुगलेलं दिसून येतंय. हा प्राणी अत्यंत विचित्र पद्धतीने दिसतो. (Alien in Australia)
ऑस्ट्रेलियाचा क्वीन्सलँडमध्ये अॅलेक्स टॅन हा तरुण मारूचीडोर बीचवर फेरफटका मारत असताना त्याला हा एलियन सारखा दिसणारा प्राणी सापडला आहे. त्याने लागलीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याने 1 एप्रिल रोजी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, मी काहीतरी विलक्षण असं पाहून अडखळलो आहे. लोक ज्याला एलियन असं म्हणतात, असं काहीतरी मला दिसतंय.
या व्हिडीओमध्ये दिसतंय की, हा प्राणी अत्यंत विचित्र आहे. तो मृत कांगारुही वाटत नाहीये. हा प्राणी नेमका कोणता आहे? तो खरंच एलियन आहे का? यासंदर्भातील प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.
हेही वाचा: सेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार? दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात
Web Title: Alien Creature That Washed Ashore In Australia Possibly Identified
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..